गोंदिया: जहाल माओवादी ‘देवसू’ची पोलिसांसमोर शरणागती

गोंदिया: जहाल माओवादी ‘देवसू’ची  पोलिसांसमोर शरणागती
  • MG News
  • मे 20 2025

Share on  

गोंदिया: जहाल माओवादी ‘देवसू’ची पोलिसांसमोर शरणागती   

       सन 2017 पासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या तसेच गोंदिया, गडचिरोली व छत्तीसगड राज्यात माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या व 3.50 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवादीने गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. देवसू उर्फ देवा राजा सोडी (24) रा.चितिंगपारा, जि.बिजापूर (छत्तीसगड) असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचे नाव आहे. या माओवाद्याने गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांच्या समक्ष नक्षल आत्मसमर्पण योजनेतंर्गत आत्मसमर्पण केले आहे.
 

संबंधित बातम्या