कर्जदारांसाठी खुशखबर..

कर्जदारांसाठी खुशखबर..
  • MG News
  • जून 9 2025

Share on  

रिझर्व बँक ऑफ इंडिया ने रेपो रेटमध्ये अर्धा टक्के कपात केल्यानंतर अनेक बँकांनी कर्जांच्या व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही जर बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक युको बँक अशा बँकांकडून कर्ज घेतले असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या बँकांकडून होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. जर तुमचे कर्ज रेपोरेटशी जोडलेले असेल तर तुम्हाला ईएमआय मध्ये थेट फायदा मिळेल बँक स्वतः तुमचा कमी करतील किंवा कर्जाचा कालावधी कमी करतील. मात्र जर बँक फक्त कालावधी कमी करत असतील आणि तुम्हाला ईएमआय कमी करायचा असेल तर तुम्ही यासाठी बँकेला विनंती करू शकता.

 
आरबीआयने रेपो रेट कमी केल्यानंतर अनेक सरकारी बँकांनी व्याजदर कमी केले आहेत. पूर्वी फक्त नवीन ग्राहकांना कमी व्याजदराचा फायदा मिळत होता. परंतु यावेळी बँकांनी जुन्या ग्राहकांसाठी देखील व्याजदर बदलले आहेत. जर तुम्ही नवीन गृह कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी हा योग्य वेळ असू शकतो कारण व्याजदर कमी झाल्यानंतर कर्ज पूर्वीपेक्षा स्वस्त झाले आहे.

संबंधित बातम्या