आतंकवादाचा अन जिहादाचा रंग हिरवाच; नितेश राणे आक्रमक

आतंकवादाचा अन जिहादाचा रंग हिरवाच; नितेश राणे आक्रमक
  • MG News
  • जुलै 31 2025

Share on  

महाराष्ट्रातील मालेगावमध्ये रमजानच्या दिवशी बॉम्बस्फोट झाला होता. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील भिक्कू चौकामध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी हा स्फोट झाला.
हा स्फोट नवरात्री आणि रमजान महिन्याच्या पूर्वसंध्येला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि १०० जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तब्बल १७ वर्षानंतर निकाल हाती आला आहे.  यामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. त्याचप्रमाणे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर नितेश राणे यांनी टीका करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. 
मंत्री नितेश राणे म्हणाले की, "या मालेगावच्या प्रकरणातून समाजाची जी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला होता त्यांच्या तोंडावर चपराक बसली आहे. त्यामुळे यापुढे हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करु नये. परत परत एकच विषय सिद्ध होतो आहे की आतंकवादाचा रंग आणि जिहादाचा रंग हा हिरवाच आहे." अशी गंभीर शब्दांत मंत्री नितेश राणे यांनी मालेगाव प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे ते म्हणाले की, "काँग्रेस काळामध्ये हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंदुत्ववादी विचारसरणीचे राज्य आणि केंद्र सरकार असताना मात्र हे शक्य नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षेत आहे हे पुन्हा सिद्ध झालंय. खरंतर या लोकांनी हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे. यांनी मंदिरात जाऊन हिंदू समाजाची माफी मागावी, असा टोला देखील मंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे.

संबंधित बातम्या