गुणरत्न आरोग्य फाउंडेशन तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्रंबक रोड वरील पूर्ण कृती पुतळ्यास अभिवादन करून महापुरुषांचे विचार तागापर्यंत पोचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक वाटप करण्यात आले. तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून 'अण्णाभाऊ साठेंचा विजय असो' अशा घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमास आरोग्य सेवक दीपक डोके, कल्पराज ग्रुपचे संचालक संजय भाऊ निकम, वंचित बहुज आघाडी चे नेते बाळासाहेब शिंदे, भारतीय जनता पक्षाचे नेते दिनेश उनवणे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष अहिरे, उत्तम जाधव, नंदन पाईकराव,चैतन्य गांगुर्डे, बाळासाहेब शिरसाट,आदी समाज बांधव उपस्थित होते.