कोकाटेंच्या मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीका

कोकाटेंच्या मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीका
  • MG News
  • जुलै 30 2025

Share on  

 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज अकोल्यात उपचार सुरू असलेल्या खामगावच्या दलित तरुणाची भेट घेतली आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या रोहन पैठणकर या दलित तरुणाला कथित गोरक्षकांकडून मारहाण झाली होती. तर त्याच्यावर सध्या अकोल्याचा जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर सपकाळ यांनी आज या तरुणाची भेट घेत त्याची विचारपूस केली आणि यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

यासंदर्भात राज्यात दलितांवर सरकारच्या कृपेने अत्याचार सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तर दलित तरुणाला अमानुष मारहाण करणारे आरोपी जामिनावर सुटतात कसे?, असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे. तर अकोल्यातील उपचारात सरकार या दलित तरुणाची जाणीवपूर्वक हेळसांड करीत असल्याचा गंभीर आरोप ही सपकाळ यांनी केला आहे.

तर कोकाटेंच्या मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली असून देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या इतिहासातील सर्वात लाचार मुख्यमंत्री असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विधिमंडळाला 'डब्ल्यूडब्ल्यूएफ'चा आखाडा केल्याचा प्रहार त्यांनी केला आहे. तर एकनाथ खडसेंच्या जावयाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

तर भाजप आणि मोदींना विरोध करणाऱ्या कुणाचंही स्वागत असल्याचं सांगत त्यांनी राज ठाकरे यांच्या संभाव्य मैत्रीवर भाष्य केल असून सध्या खिचडी शिजत आहे. मात्र, आत्ताच महाविकास आघाडीत कोणताही नवा भिडू येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केल आहे.

संबंधित बातम्या