साथीच्या रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

साथीच्या रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज
  • MG News
  • जून 19 2025

Share on  

पावसाळ्याला सुरुवात झाली असून या काळात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.  या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज झाला असून पावसाळ्यामुळे होणाऱ्या विविध आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती मोहिम हाती घेण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाने मान्सूनपूर्व तयारीची सर्व कामे पूर्ण केली आहेत. जिल्ह्यामध्ये 54 प्राथमिक आरोग्य केंद्रे सज्ज आहे. आणि सर्व ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नेमले आहे. उपकेंद्रांमध्ये औषधसाठा, आवश्यक उपकरणे आणि मनुष्यबळ यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने पावसाळ्यातील साथीच्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी कंबर कसली आहे. दरवर्षीप्रमाणे गावागावांमध्ये आपण साथीच्या रोगा संदर्भात सूचना दिल्या आहे. पाणी स्वच्छ करून तसेच साचलेल्या कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी यासोबतच ग्रामपंचायत यांना सुद्धा आपण सूचना दिल्या आहे. आणि नागरिकांनीही आरोग्य विभागाला सहकार्य करून आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते यांनी केले आहे.
 

संबंधित बातम्या