राज्यात तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात सुद्धा जोरदार पाऊस होतोय.
शेतकऱ्यांनी खरीपात पेरलेल्या सोयाबीन, मका, कपाशी या पिकांत पाणी शिरले असून पीक पूर्ण पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे तात्काळ मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी आहे.