पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

 पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
  • MG News
  • सप्टेंबर 24 2025

Share on  

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा एकही शेतकरी वंचित राहणार नाही, सर्व पंचनामे करण्यात येतील, असे आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

शेतकऱ्यांची मागणी आहे की सरसकट मदत जाहीर करावी. यावर प्रतिक्रिया देताना भरणे म्हणाले, "एका ठिकाणी गेलो काय आणि दहा ठिकाणी गेलो काय, तुमच्या गावात एक गुंठ्याचा देखील पंचनामा राहणार नाही. गुरांचे, घरांच्या परझडीचे किंवा झाडांचे नुकसान असो, त्याची नोंद केली जाईल."

भरणे यांनी पुढे सांगितले की, राज्यात सुमारे ८० लाख एकर तर जालना जिल्ह्यात दोन लाख चोपन्न हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. "प्रत्येक शेतात प्रत्यक्ष फिरता येत नाही, पण महसूल व कृषी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. कोणाच्याही नुकसानीकडे दुर्लक्ष होणार नाही," असे ते म्हणाले.

कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले की पंचनाम्याचे काम पुढील आठ-दहा दिवसांत पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल. त्यांनी जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे दुःख समजून घेण्याचे, बांधावर जाऊन त्यांना आधार देण्याचे आवाहन केले.

“मी स्वतः शेतकऱ्यांचा मुलगा आहे. ज्याचे नुकसान झाले त्याची योग्य भरपाई होईल. या काळात कोणी चुकीचे वागत असेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल,” असे आश्वासन भरणे यांनी दिले.

संबंधित बातम्या