एपीएमसी बाजारात ड्रायफ्रूट्सला मोठी मागणी; तब्बल २०० रुपयांनी दरामध्ये वाढ

एपीएमसी बाजारात ड्रायफ्रूट्सला मोठी मागणी; तब्बल २०० रुपयांनी दरामध्ये वाढ
  • MG News
  • ऑगस्ट 1 2025

Share on  

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये सध्या ड्रायफ्रूट्सला मोठी मागणी असून, दर देखील वाढले आहेत. तब्बल २०० रुपयांच्या फरकाने किमतीमध्ये वाढ झाली आहे. सध्या बदाम, काजू, खजूर, मनुके या सह विविध ड्रायफ्रूट्सची ६०० ते १२०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. तर मागील काही दिवसांपासून हे दर २०० रुपयांनी वाढले आहेत. तसेच गणपती व दिवाळी पर्यंत हे दर असेच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. 

संबंधित बातम्या