एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नामवंत संगोपन संस्थेतील धक्कादायक प्रकार

एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नामवंत संगोपन संस्थेतील धक्कादायक प्रकार
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

एका एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन, गर्भवती राहिल्यावर तीचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
लातूर जिल्ह्यातील हसेगाव या गावातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे, एका एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. त्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथून ही घटना समोर आली आहे. एचआयव्हीबाधित अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन गर्भवती राहिलेल्या मुलीचा गर्भपात करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
औसा तालुक्यातील एक नामवंत एचआयव्ही बाधित संगोपन संस्था आहे. या संस्थेत एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. तसेच बलात्कारनंतर सदर मुलीचा गर्भपातदेखील केला. या गर्भपातामुळे हे धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पीडित मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मुलीच्या तक्रारीवरून ढोकी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरील मुलीवर दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत. यानंतर लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या