मुंबईतील एक रिक्षा चालक दिवसाला किती पैसे कमवतात?

मुंबईतील एक रिक्षा चालक दिवसाला किती पैसे कमवतात?
  • MG News
  • जून 5 2025

Share on  

मुंबईतील एक रिक्षावाला दिवसाला किती पैसे कमवतो असं विचारलं तर उत्तर येईल 2 हजार रुपये मात्र मुंबईतील एक रिक्षावाला महिन्याला पाच ते आठ लाख रुपयांची कमाई करत आहे. विशेष म्हणजे परीक्षा चालवत देखील नाही मात्र त्याच्या सुपीक डोक्यात आलेली एक कल्पना चालली आणि त्याने अनेकांना अचंबित केलं.

लेन्स कार्ट कंपनीचे प्रोडक्ट लीडर राहुल रूपाणी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुंबईतील लाखोंची कमाई करणाऱ्या रिक्षा चालकाची माहिती दिली. रूपाणी विसाच्या अपॉइंटमेंट साठी अमेरिकन वाणिज्य दूतावासात गेले असताना त्यांना सुरक्षारक्षकांनी अडवलं आणि त्यांची बॅग आत घेऊन जाण्यास मज्जाव केला. अमेरिकन वाणिज्य दुतावासात लोकांची सुविधा किंवा इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. येणाऱ्या लोकांची हीच गरज रिक्षा चालकाने ओळखली.  रिक्षा चालकाने म्हटलं की "साहेब बॅग द्या, मी सुरक्षित ठेवेल माझं रोजचं काम आहे हजार रुपये लागतील."

रूपाणी यांनी म्हटलं की आधी मला भीती वाटली मात्र अमेरिकन वाणिज्य दूतावासातील काम देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे आता सामान कुठे ठेवायचं असा विचारही मनात आला. अशाप्रकारे रिक्षा चालकाची व्यवसायाची भन्नाट आयडिया त्यांना कळली रूपांनी यांनी अधिक माहिती विचारली त्यावेळी रिक्षा चालकाने सांगितलं की तो रिक्षा अमेरिकन वाणिज्य दूतावासा बाहेर पार्क करतो आणि सर्व ग्राहकांना हजार रुपयांमध्ये ही बॅग कीपिंग सेवा देतो.

संबंधित बातम्या