भिवंडी वाडा महामार्गावर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या महामार्गावर पडलेले खड्डे व काँक्रिटीकरणच्या कामामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.तसेच महामार्गावर बंद पडलेल्या कंटेनरमुळे देखील वाहतूक कोंडी होतेय.ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची कसरत चालू आहे. या महामार्गावर ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे झाल्याने भिवंडी वाडा मार्गावरील वाहतूक मंदावली आहे.