मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विटा मध्ये भाजप कडून कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याला मंत्री जयकुमार गोरे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती होती.
गोपीचंद पडळकर आणि मी जिवा भावाचे मित्र आहोत. आणि माझ्या खात्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्यासाठी बजेटचा विषय नाही. देवेंद्र फडणवीस माझ्या खात्याला जो बजेटचा कोटा देतील, तो सगळा कोटा गोपीचंद पडळकर यांच्यासाठी द्यायची माझी तयारी आहे, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणालेत. गोपीचंद पडळकर हा सर्वसामान्य व्यक्तीसाठी काम करणारा, व्यथा मांडणारा आणि तो प्रश्न तडीस नेणारा हा बहुजनांचा नेता आहे. एखाद्या प्रश्नासाठी गोपीचंद पडळकर यांच्यावर मुद्द्याने आणि वेळ आली तर गुद्याने देखील लढायची तयारी असते. त्यामुळे असे नेतृत्व आपण वाढवले पाहिजे असे मंत्री जयकुमार गोरे म्हणालेत.
पृथ्वीच्या अंतापर्यत आमच्या माण खटाव भागात पाणी येणार नाही, असे बारामतीची मंडळी सांगत होते. त्यामुळे आमच्या भागातील माणसे देखील पाणी मागत नव्हते. पण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आमच्या भागात पाणी आले. आज आमच्या तालुक्यात ५ कारखाने उभे आहेत. त्यामुळे ज्या भागात पृथ्वीच्या अंतापर्यत पाणी न येणाऱ्या भागात या निवडणुकीत मी उभे राहिलो आणि दुष्काळ मुक्तीसाठी मी उभा राहिलो आहे. असे जनतेला सांगितले.