राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे गेल्या अनेक दिवसांपासून चांगलेच अडचणीत सापडले आहे. अशातच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे दोन दिवसीय धुळे जिल्हा दौऱ्यावर असून आज रात्री उशिरा त्यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी त्यांना त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी थांबवले असता त्यांनी सांगितले की मी माझी भूमिका कालच स्पष्ट केली आहे. आता येणाऱ्या काळात माझे कार्यकर्तेच बोलतील अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावेळी व्यक्त केली.