शेतकऱ्याच्या नेत्याला मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाणचे बॅनर तात्काळ काढा

शेतकऱ्याच्या नेत्याला मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाणचे बॅनर तात्काळ काढा
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

आज दिनांक 24 जुलै 2025 गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता जालना येथे शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष कारभारी म्हसलेकर यांनी जालना प्रशासनाला महानगरपालिकेला इशारा दिला आहे की, जालना महानगरपालिका परिसरात मुख्य महामार्गावर काही बॅनर लागलेले आहेत. या बॅनरवर शेतकऱ्याच्या नेत्याला सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमात अमानुष मारहाण करणारा फरार आरोपी सुरज चव्हाण यांचे फोटो असलेले बॅनर लावण्यात आले आहे, ते बॅनर तात्काळ काढावे. अन्यथा दोन दिवसात आम्ही स्वतः ते बॅनर काढून टाकू, असा इशारा याप्रसंगी शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष कारभारी मसलेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या