ठाणे पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून आंबा महोत्सवाचे उद्घाटन,

ठाणे पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून आंबा महोत्सवाचे उद्घाटन,
  • MG News
  • मे 2 2025

Share on  

ठाणे पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून आंबा महोत्सवाचे उद्घाटन, 
ठाण्याच्या गावदेवी मैदानात १२ मे पर्यंत आंब्याचा दरवळ

 ठाण्याचा आंबा महोत्सव हा बाजार नाही तर, ही चळवळ आहे. गेली १८ वर्ष सुरू असलेल्या या चळवळीचा एक ठाणेकर म्हणून मला अभिमान आहे. असे कौतुकोद्गार प्रसिद्ध हास्य अभिनेते दत्तु मोरे यांनी काढले. गुरुवारी ०१ मे या महाराष्ट्र दिनी ठाण्याच्या गावदेवी मैदानात चिमुकल्या पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून आंबा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी अभिनेते दत्तु मोरे बोलत होते.
   महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच, संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने १ मे ते १२ मे या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदानात भव्य आंबा महोत्सवाला प्रारंभ झाला. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय केळकर, सौ.कमल संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, माजी नगरसेवक नारायण पवार, भरत चव्हाण, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, ओमकार चव्हाण, भाजप व्यापारी सेलचे अध्यक्ष मितेश शहा, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, राजेश गाडे, भाजयुमो अध्यक्ष सुरज दळवी, सचिन केदारी आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अभिनेते दत्तु मोरे यांनी, आपण आता ठाणेकर असल्याचा उल्लेख करीत गेली १८ वर्षे सुरू असलेल्या या आंबा महोत्सवाच्या चळवळीचे कौतुक केले. तसेच कोकणातील शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्यासाठी ही चळवळ सुरू ठेवणाऱ्या अभिनय क्षेत्रात सहकारी असलेल्या आ. संजय केळकर यांचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून ऋषी देसाई यांनी अस्सल मालवणी भाषेत आंबा महोत्सवाचे गा-हाणे घातले. तर, आ. निरंजन डावखरे यांनी देखील आंबा महोत्सवाच्या चळवळीचे कौतुक करीत शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या.
 

 संजय केळकर, आमदार

संबंधित बातम्या