नाशिकमध्ये डान्स क्लासचा हट्ट: मुलीने गमावला जीव

नाशिकमध्ये डान्स क्लासचा हट्ट: मुलीने गमावला जीव
  • MG News
  • जुलै 23 2025

Share on  

आई-वडिलांनी डान्स क्लास लावून दिला नाही त्यामुळे मुलीने टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवलं. ही घटना नाशिकच्या म्हसरूळ परिसरात घडली. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी नाशिकचे म्हसरूळ पोलिस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरामधील म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने रागाच्या भरात आत्महत्या केली.

या मुलीने आई-वडिलांकडे डान्स क्लास लावण्यासाठी हट्ट केला. पण त्यांनी तिला लगेच डान्स क्लास लावण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या मुलीने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

या मुलीला तिच्या कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पण मुलीची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला तात्काळ उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले. मुंबईतील केईएम रुग्णालयात या मुलीवर उपचार सुरू होते.

पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. 

संबंधित बातम्या