डोंबिवली जिमखाना येथे भाजप महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला भाजप नेत्या चित्रा वाघ उपस्थित होत्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला मोर्चा कसा सज्ज असावा आणि ५०% आरक्षण तसेच विभागांचा आढावा कसा घ्यावा, यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला मोर्चाची रणनीती, कल्याण-डोंबिवलीतून अनेक कार्यकर्ते मुंबईला येत असतात, याकडे लक्ष वेधत वाघ म्हणाल्या की, "पालिका निवडणुका तोंडावर असताना महिला मोर्चा म्हणून आमची काय नीती असली पाहिजे याबद्दलची आज बैठकीत चर्चा झाली. ५०% आरक्षण आहे, कित्येक जणी माझ्या सहकारी यावेळेला नगरसेविका होतील काय आणि कशा पद्धतीने करायला पाहिजे या विषयावर महत्त्वाची चर्चा झाली आणि यातूनच येणाऱ्या निवडणुकीची दिशा ठरणार आहे."असे मत आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदींनी विरोधाकांना एका गाडीत भरून सीमेवर पाठवून द्यायला पाहिजे, अशी चित्रा वाघ यांनी विरोधकांवर टीका केली आहे. सैन्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे देखील वाघ म्हणाल्या आहेत.