गेल्या ११ वर्षांपासून देशात आरएसएस प्रणित सरकार असल्यामुळे "संविधान बदल" या आरएसएसच्या ध्येलाला गती प्राप्त होत आहे. सरकारचे हे अभय असल्यामुळे काही दिवसांपूर्वी पुणे शहरात "संविधान का बदलावे?" या शीर्षकाचे पुस्तक प्रकाशित झाले. याचा शरद पवार गटाकडून निषेध करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.
या पुस्तकाच्या प्रकाशनास केवळ दिखाव्यासाठी पुणे पोलिसांनी निर्बंध केला. मात्र तरीही हा प्रकाशन सोहळा बिनदिक्कतपणे पार पडला, हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.
सरकार पुरस्कृत या संविधान विरोधी कृतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. हा निषेध व्यक्त करण्यासाठी पक्षाच्यावतीने उद्या निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.