ज्या जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले, त्यांच्या नावाविषयी देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनात आदराचे स्थान आहे. त्यांच्या नावाने कंत्राटदार कंपनी काढून एखादा कंत्राटदार भ्रष्टाचार करीत असेल तर राज्य सरकारने त्याला जिजाऊंचे नाव तरी वापरु दिले नाही पाहिजे. त्याने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी केली आहे. त्यांनी निलेश सांबरे यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
आज कल्याणमध्ये माजी खासदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पाटील यांनी टीका केली. पाटील यांनी सांगिलले की, वाडा रस्ते कामात भ्रष्टाचार झाला आहे. संबंधित कंत्राटदाराने ज्या पक्षात प्रवेश केला त्याच पक्षाचे आमदार शांताराम मोरे यांनी त्याचं रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम केले. रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना त्यांनी नागपूर अधिवेशात विधी मंडळात उत्तर दिले आहे की, संबंधित ठेकेदाराला तात्काळ आम्ही ब्लॅकलिस्ट करतो. दुर्दैवाने ते झाले नाही. आत्ता झाले नाही तर आंदोलनाच्या वेळी श्रमजीवी संघटनेला जिल्हाधिकारी यांनी पत्र दिले. तत्कालीन बांधकाम मंत्री चव्हाण यांनी जे आश्वासन दिले होते. त्या प्रमाणे आम्ही कारवाई करु, असे आश्वासन दिले आहे. जे पत्र श्रमजीवी संघटनेने व्हायरल झाले तेच पत्र मी वाचले. त्या अनुषंगाने संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे.
दरम्यान, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचे काम ठाणे ते भिवंडी दरम्यान झाले आहे. भिवंडीतून हे काम अंडरग्राऊंड केले जाणार आहे. त्यानंतर कल्याण-दुर्गाडी ते सहजानंद ऐवजी तो मार्ग कल्याण बिर्ला मार्गे जाणार स्टेशनला जाणार आहे. त्याचा डीपीआर तयार केला गेला आहे की नाही याची माहीत घेतली जाणार आहे. मात्र, या मेट्रो मार्गाचे काम महाविकास आघाडी सरकारमुळे रखडले, असा आरोप पाटील यांनी केला आहे.