शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय!

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय!
  • MG News
  • जून 6 2025

Share on  

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते, 
विविध ब्रोकरेज संस्थांच्या म्हणण्यानुसार निफ्टी मायक्रो कॅप 250 इंडेक्स मधील काही शेअर्स पुढील बारा महिन्यात दमदार परतावा देऊ शकतात. या यादीत राजेश एक्सपोर्ट, स्ट्राइड्स फार्मा, महिंद्रा लाइफ स्पेस, ऑर्किड फार्मा यांसारख्या शेअर्सचा समावेश आहे. यांसारख्या कंपन्या टॉप पिक ्स मध्ये गणल्या जातात. या शेअर्समध्ये 70% ते तब्बल 200 टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

राजेश एक्स्पोर्ट: ही कंपनी दागिन्यांच्या व्यवसायात अग्रगण्य असून ती सर्वाधिक परताव्याची संधी देणारी असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

पैसालो डिजिटल: या एनबीएफसी क्षेत्रातील शेअरला विश्लेषकांनी 'स्ट्रॉंग बॉय' रेटिंग दिले आहे. 

स्ट्राइड्स फार्मा: फार्मासिटिकल क्षेत्रातील ही कंपनी दोन विश्लेषकांच्या मजबूत शिफारशी सह गुंतवणूक योग्य मानली जाते. 

ऑर्किड फार्मा: तीन ब्रोकिंग संस्थांनी 'मजबूत खरेदी' सल्ला दिला आहे. 

ओल्कार्गो लोजिस्टिक्स: लॉजिस्टिक सेक्टर मधील हा शेअर तीन विश्लेषकांच्या 'बाय' रेटिंग सह आगामी काळात चांगला परतावा देऊ शकतो.

गुजरात अंबुजा: अन्नप्रक्रिया व्यवसायात कार्यरत असलेल्या या कंपनीला एक विश्लेषक 'स्ट्रॉंग' रेटिंग देतो.

संबंधित बातम्या