चोपडा नगरपरिषदेच्या वतीने मान्सून पूर्व गटारी व नालेसफाईचा दावा केला आहे परंतु पावसाळा सुरू होण्याआधीच चोपडा शहरातील मेन रोडवर गटारीचे पाणी वाहत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्या पाण्यातून वाट काढून चालावे लागत आहे. जवळच सार्वजनिक मुतारी असल्याने त्या मुतारीचे मूत्र विसर्जन ते देखील रोडावर येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गटारीची साफसफाई ही फक्त फोटोसेशन करण्यापुरता केली जाते का असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे. नगरपरिषदेचे पाणी नळाला आल्यानंतर व पावसाचे पाणी आल्यानंतर चोपडा मेन बाजारपेठेतील गटारी तुंबून वाहत असतात आणि सर्व पाणी रस्त्यावर आल्याने त्या रस्त्यावरून वाहन व पायी चालणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. वारंवार नगरपालिकेकडे तक्रार करून देखील नगरपालिकेचे प्रशासन लक्ष देत नाही. नगरपालिकेचे मुख्याधिकारी व अधिकारी यांनी रस्त्यावर फिरावे अशी देखील अपेक्षा या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.