जालना : वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
जालन्यातल्या भाटेपुरी येथे अंगावर वीज पडून एका तरुण शेतकर्याचा मृत्यू झाला. विठ्ठल गंगाधर कावळे असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. भाटेपुरी येथील शेतकरी विठ्ठल हा शेतात मान्सूपूर्व कामे करण्यासाठी गेला होता. मात्र अचानक वादळी वारा आणि पाऊस सुरु झाला. त्याचवेळी अंगावर वीज कोसळून विठ्ठल कावळे या शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती कळताच मृतदेह प्रशासनाने शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला.