;जालना : युवकांचा संशयास्पद जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

;जालना : युवकांचा संशयास्पद जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने  खळबळ
  • MG News
  • फेब्रुवारी 9 2025

Share on  

;जालना : युवकांचा संशयास्पद जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने  खळबळ 

आकाश बबनराव जाधव (22 वर्ष ) मयताचे नाव  आहे. बदनापूर तालुक्यातील मेव्हणा शिवारातील ही घटना घडलीय. पोलीसानी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय. अज्ञाताने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी जाळून टाकल्याची  प्राथमिक माहिती समोर आलीय. मात्र नेमक कश्यावरुन खून,कोणी, का केला?, हें पोलीस तपासात निष्पन्न होईल

नेमके काय आहे हें प्रकरण 
- 22 वर्षीय आकाश जाधव याचा मृतदेह बदनापूर तालुक्यातील मेव्हणा शिवारात जळालेल्या अवस्थेत आढळला. आकाश हा नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी  रात्रीच्या वेळी अंगणात गेला. मात्र आकाश तिथे न दिसल्याने बाहेर शौचालयास गेला असावा असा अंदाज वर्तविला.पण बराच वेळ उलटूनही आकाश काही घरी आलाच नाही. वडिलांची धाकधूक  वाढल्याने त्यांनी ग्रामस्थांसह नातेवाईकाना फोन द्वारे विचारपूस केलीय.आकाशला त्याच्या वडिलांसह ग्रामस्थांनी शोधन्यास सुरुवात केलीय. अक्ख गाव शोधून काढले पण आकाश काही सापडला नाहीये. ग्रामस्थांनी आकाशचा शोध घेत असताना सकाळी 11च्या सुमारास घरापासून 500 मीटरच्या अंतरावर एका शेतातील शेततळ्यात जळालेल्या अवस्थेत आकाशचा मृतदेह आढळला. याची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ बदनापूर पोलिसांना दिलीय. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केलाय. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनकामी जालन्यातील घाटी हॉस्पिटलला रवाना केलंय. आकाशचा खून करून त्याला जाळल्याचा संशय नातेवाईकानी व्यक्त केलाय.लवकरात लवकर आरोपीला शोधून जेरबंद करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आलीय..

संबंधित बातम्या