जालना : पाक हल्ल्यावेळी भारतीय सैन्याने चारी मुंड्या चीत केल्या - मंत्री अर्जुन खोतकर
आज भारतीय सैनिकांचा व त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे. कारण ज्या ज्या वेळेस पाकिस्तानने आपली अतिरेकी समोर करून भारतावर भ्याड हल्ले केले. या भ्याड हल्ल्याचा भारतीय सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावून प्रत्युत्तर दिले. व पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केल. त्याबद्दल या सैनिकांचा खरंच आम्हाला अभिमान आहे, आणि म्हणूनच या सैनिकांचा सन्मान करण्यासाठी देशभरात व राज्यभरात या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, रंगा रॅलीच्या माध्यमातून या सैनिकांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. आणि सैनिकांनी केलेल्या या कार्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत.