जालना : जरांगे मुंबईला मोर्चा काढू शकत नाही - गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे हा पावसाळ्यात उगवणार्या छत्र्यांसारखा आहे. असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंवर सडकून टीका केली. सदावर्ते जालना दौर्यावर असताना ते माध्यमांशी बोलत होते. जरांगे मराठ्यांचा कर्दनकाळ ठरला आहे. जरांगेच्या ढोंगामुळं मराठे नोकरीला लागले नाहीत. त्यामुळं जरांगे पुन्हा चुळबुळ चुळबुळ बुळबुळ करायला लागला आहे. मात्र जरांगे मुंबईला मोर्चा काढू शकत नाही, असंही सदावर्ते यांनी म्हंटलं आहे..