जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर प्रहार संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करत पत्ते उधळण्यात आले आहेत. निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. बच्चू कडू यांनी उपोषण मोर्चे काढले, मात्र सरकारवर त्याचाही काही परिणाम झाला नाही. त्यामुळे प्रहार संघटनेच्यावतीने जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी टायर पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी रोडवर पत्ते उधळत राज्य सरकारचा निषेध केला आहे. त्याचबरोबर यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.