मविप्र राजर्षी शाहु महाराज पॉलिटेक्निक येथे रोजगार मेळावा संपन्न

मविप्र राजर्षी शाहु महाराज पॉलिटेक्निक येथे रोजगार मेळावा संपन्न
  • MG News
  • ऑक्टोबर 14 2025

Share on  

मविप्र राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक नाशिक आणि सीआयआय मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी राजर्षी शाहु महाराज पॉलिटेक्निक, उदोजी मराठा बोर्डींग कॅम्पस, गंगापुर रोड, नाशिक येथे करण्यात आले. यामध्ये ३० कंपन्याचे जवळजवळ ५००० जॉब ओपनिंग आणि १८०० विद्यार्थ्यांचे या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यात आले.
सदर कार्यक्रमचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म.वि.प्र. समाजाचे सरचिटणीस अॅड. नितीनजी ठाकरे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमा अंतर्गत नाशिक मध्ये एक फार रोजगाराच्या दृष्टीने फार मोठा बद्दल घडेल. नाशिक मधल्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्याकरता या कार्यक्रमातून सुरुवात करण्यात आलेली आहे राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक नाशिक या ठिकाणी CII MCC करिअर सेंटर चालवत आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत कौन्सिलिंग ट्रेनिंग आणि प्लेसमेंट साठी माहिती देऊन त्यांना नाशिक आणि महाराष्ट्रातल्या इतर नामांकित कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध करण्याचे काम या ठिकाणापासून करण्यात येणार आहे. महिन्याच्या प्रत्येक शनिवारी या ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलवून त्यांना योग्य त्या कंपनीमध्ये मार्गदर्शन करून त्यांचे इंटरव्यू घेऊन या ठिकाणी आपण त्यांना मार्गदर्शन मॉडल करिअर सेंटर तर्फे करण्यात येणार आहे. नाशिक मधल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी नोकरी संदर्भात योग्य माहिती मिळेल म्हणून रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी तरी संधीचा योग्य तो फायदा घ्यावा.
 या कार्यक्रमाप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीनजी ठाकरे साहेब, मविप्र समाज नाशिक संचालक ॲड.लक्ष्मणजी लांडगे साहेब, स्थानिक व्यवस्थापन समितीचे प्रमोद अहिरराव सीआयआयचे महाराष्ट्र हेड विनायक इक्के, CII SKILL INDIA दयाल कांगणे व नाशिक चे सागर चौधरी तसेच शिवराज राजुरे, योगेश कोकणे, निलेश धनवडे ,राजेश वासमवार यांचा सहभाग होता ,  त्यांची संपूर्ण टीम कार्यक्रमासाठी उपस्थित होते. 
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या जॉब फेअरमध्ये एकूण ३५१ विद्यार्थी सहभागी झाले. त्यापैकी ६५ विद्यार्थी निवडले गेले, २१६ विद्यार्थी शॉर्टलिस्ट झाले, आणि २ विद्यार्थी प्रशिक्षणासाठी निवडले गेले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. श्री रमेश अय्यर – अध्यक्ष, गिव्ह वेल्फेअर ऑर्गनायझेशन, नाशिक यांनी या जॉब फेअरसाठी विशेष सहकार्य केले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीनजी ठाकरे, सभापती मा. बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनीलजी ढिकले, उपाध्यक्ष मा. विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी तसेच सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य आणि शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

संबंधित बातम्या