कल्याण : रेल्वे स्टेशन स्कायवॉकवर भाजपाचा जल्लोष

 कल्याण : रेल्वे स्टेशन स्कायवॉकवर भाजपाचा जल्लोष
  • MG News
  • मे 7 2025

Share on  

 कल्याण : रेल्वे स्टेशन स्कायवॉकवर भाजपाचा जल्लोष

 भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करत दहशतवादी हल्ल्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले. भारत सरकारच्या या कारवाईनंतर देशभरात आनंद उत्सव साजरा करण्यात येतोय. आज सायंकाळी भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह भाजप महिला कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी कल्याण रेल्वे स्टेशन वरील स्कायवाकवर प्रवाशांना पेढे वाटून जोरदार घोषणाबाजी करत आनंद उत्सव साजरा केला. यावेळी आमदार सुलभा गायकवाड यांनी महिला प्रवाशांना हळदी कुंकू लावत आनंद उत्सव साजरा केला. काश्मीर पहलगाम येथे दहशतवाद्यांनी ठरवून पुरुषांना मारले आणि माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचे काम केलं. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळे उध्वस्त केली. ऑपरेशन सिंदूर राबवत महिलांना न्याय दिलाय त्यामुळे आज महिलांना हळदीकुंकू लावून आनंद साजरा करत असल्याचे आमदार सुलभा गायकवाड यांनी सांगितले.

 सुलभा गायकवाड, भाजपा आमदार

  नरेंद्र सूर्यवंशी, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष

संबंधित बातम्या