कल्याण : नशेखोरांच्या विरोधात डीसीपी अतुल झेंडे यांची मोठी कारवाई
कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात गांजा विक्री जोरात सुरु आहे. शाळेतील विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी लक्ष्य करीत गांजा तस्कर पोहचतात. कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी गांजा तस्कराच्या विरोधात मोठी कारवाई सुरु केली आहे. कल्याण पोलिस उपायुक्तांच्या स्का’डने तीन ठिकाणाहून तीन गांजा तस्करांना अटक करीत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे.
कल्याण डोंबिवलीत आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणा नशेचा व्यापार सुरु आहे. कल्याण पोलिसांनी नसेखोरांना आळा घालण्यासाठी चांगला पोलिस अधिकाऱ्याचा आणि कर्मचाऱ्यांच्या स्कॉड तयार केला आहे. डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्कॉर्ड ने काम करीत आहे. गेल्या पाच महिन्यापासून या स्कॉड ने खूप चांगली कारवाई केली आहे. आणि अनेक गांजा तस्करांना अटक करुन गांजा, एमडी ड्रग्ज, नशा करणारी औषधे जप्त केली आहेत. नशेखोरांचे रॅकेट उद्धवस्त झालेले नाही. कल्याणच्या डीसीपी स्का’डने कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्तीतून गोपाळ भिडे याला अटक केली आहे. हा विद्यार्थ्यांना गांजा विक्री करीत होता. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी सहणाज इराणी या महिला गांजा तस्कराला अटक केली आहे. तर कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रथमेश गायकवाड याला विजयनगर येथून अटक करुन त्याच्याकडून गांजा जप्त केला आहे. डीसीपी स्का’डकडून मोठया प्रमाणात कारवाई केली जाते. संबंधित पोलिस स्टेशननेही गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे .