फेरीवाला प्रश्नावरील चर्चेदरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी वैशाली दरेकर यांना आयुक्त ओरडले असल्याचा आरोप आहे.
आयुक्तांच्या दालनाबाहेर ठाकरे गटाचा ठिय्या सुरु असून स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी लेखी आश्वासन देण्याचा ठाकरे गटाने आग्रह धरला होता.