कल्याण : केडीएमसी आयुक्तांची रुक्मिणी बाई रुग्णालयात सरप्राईज व्हीजिट
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी आज महापालिकेच्या रुक्मिणी बाई रुग्णालयात अचानक भेट दिली. आयुक्त गोयल यांनी आपली ओळख लपवत सर्वसामान्य माणूस म्हणून या रुग्णालयात भेट दिली. त्यांनी सुरुवातीला केस पेपर काढल्यानंतर डॉक्टरकडे उपचारासाठी गेले. दोन दिवसांपूर्वी रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर रुक्मिणी बाई रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था पाहण्यासाठी आयुक्तांनी थेट सर्वसामान्यांच्या वेशात केडीएमसी रुग्णालय गाठले. यावेळी त्यांनी डॉक्टर कर्मचाऱ्यांना रुग्णांशी संवेदनशीलपणे वागण्याचा सूचना दिल्या. तसेच औषधांचा देखील साठा ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. येत्या काही दिवसात रुग्णालयातील आरोग्य सेवेत बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, लवकरच बदल दिसून येतील असं आयुक्त गोयल यांनी सांगितले.
अभिनव गोयल, केडीएमसी आयुक्त