कल्याण : खासगी शाळेच्या संचालकाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल करण्याची महेश गायकवाड याची मागणी
कल्याण पूर्वेतील एका नामांकित खासगी शाळेतील संचालकाचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून, अनेक पालकांनी कोलशेवाडी पोलीस ठाणे गाठून संबंधित संचालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणावर शाळेचे संचालक सदस्य महेश गायकवाड यांनी , मीही यापूर्वी अनेकदा तक्रारी केल्या असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे