कल्याण : लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांची हमी
लाडकी बहिण योजना कधी ही बंद होणार नाही. महायुतीच्या सरकारची आमची टीम ही तीच आहे. त्याचबराेबर आमचे डबल इंजिनचे सरकार ही तेच आहे. आमच्या सरकारमध्ये प्रिटिंग मिस्टेक होत नाही अशी हमी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. कल्याण डोंबिवली महापालिकेत पीपीपी तत्वावर १० वर्षाकरीता सुमित एल्को कंपनीला कचरा वाहतूक संकलन आणि शहर स्वच्छता प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे.