कल्याण : अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ऑटोवर झाड कोसळल्याने तिघांचा मृत्यू

कल्याण : अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ऑटोवर झाड कोसळल्याने तिघांचा मृत्यू
  • MG News
  • मे 7 2025

Share on  

कल्याण : अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ऑटोवर झाड कोसळल्याने तिघांचा मृत्यू.

  मंगळवारी रात्री अवकाळी पावसात झाड एका ऑटो रिक्षावर पडल्याने तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सर्वजण ऑटो रिक्षातून प्रवास करत होते.  कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा परिसरात रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वादळासह पाऊस पडला. त्यात एक झाड कोसळले आणि एक ऑटो त्याच्या तावडीत सापडली. या अपघातात एक महिला, एक पुरूष आणि ऑटो चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक लोकांच्या मदतीने झाड हटवण्याचे काम सुरू आहे.

संबंधित बातम्या