आज, २६ जुलै २०२५, आपण कारगिल विजय दिवस साजरा करत आहोत. हा दिवस १९९९ मध्ये कारगिल युद्ध जिंकणाऱ्या भारतीय सैन्याच्या शूर सैनिकांच्या अदम्य धैर्य, शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्याचा आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आहे. नांदेड येथे या संग्रामात शहीद झालेल्या जवानांना विनम्र अभिवादन करून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण आंबेकर त्यांच्या हस्ते सैनिकांसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शन पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.