हनी ट्रॅपवरुन एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना गिरीश महाजन यांनी त्याचा एक्स अकाउंटवर प्रफुल्ल लोढा आणि एकनाथ शिंदे एकत्रीत फोटो शेअर केला आहे.गिरीश महाजन यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, एकनाथ खडसे... तुमच्या या "गुलाबी गप्पा" कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय. हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात? हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे. २०१९ ते २०२२ च्या दरम्यान अश्या खोट्या पुराव्यांचा आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली, अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले. याबद्दल सविस्तर बोलेलच... आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारूडा आहे, त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय? एकनाथ खडसे. काय तुझी ही व्यथा, असे म्हणत त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केला आहे