कोल्हापूर : दूध संघाच्या निवडणुकीत विजय ; माजी सरपंचाचा हवेत गोळीबार

कोल्हापूर : दूध संघाच्या निवडणुकीत विजय ; माजी सरपंचाचा हवेत गोळीबार
  • MG News
  • एप्रिल 30 2025

Share on  

कोल्हापूर : दूध संघाच्या निवडणुकीत विजय ; माजी सरपंचाचा हवेत गोळीबार

कोल्हापूर मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. दूध संस्थेच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर माजी सरपंचाने हवेमध्ये गोळीबार केला. विजयोत्सवामध्ये माजी सरपंचाने हवेमध्ये दोन राऊंड फायरिंग केले.
याचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या माजी सरपंचावर पोलिसांकडून कारवाई करण्यास कुचराई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या हणमंतवाडीमध्ये जय बजरंग दूध संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सत्तांतर झालं. सत्ताधारी सरदार पिंजरे यांना धक्का देत माजी सरपंच आणि यशवंत बँकेचे माजी संचालक संग्राम भापकर यांनी सत्ता मिळवली. संग्राम भापकर यांचा विजय होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलाल लावत जल्लोष केला.

संबंधित बातम्या