कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या मोर्चे बांधणीला सुरुवात

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या मोर्चे बांधणीला सुरुवात
  • MG News
  • मे 8 2025

Share on  

कोल्हापूर : स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या मोर्चे बांधणीला सुरुवात

 सर्वोच्च न्यायालयाने येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या मोर्चे बांधणीला आता सुरुवात झाली आहे. त्यातच कोल्हापुरातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटनेची जिल्हा कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली. शिवसेना उपनेते व संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली. यावेळी बोलताना दूधवडकर यांनी जिल्ह्यातील शिवसैनिक पक्षप्रमुखांचा जो आदेश असेल, त्याप्रमाणे निवडणुकीच्या रणसंग्रामात लढायला तयार असल्याचं सांगितल आहे.

अरुण दुधवडकर (शिवसेना उपनेते व संपर्कप्रमुख)

संबंधित बातम्या