विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाते. तर पालखी परतीच्या प्रवासावर असून, खामगाव येथे शेवटचा मुक्काम झाल्यानंतर पालखीने पहाटे शेगावकडे म्हणजेच माहेरी प्रस्थान करते. यावेळी शहरातील नव्हेच तर राज्यभरातील भाविक पालखीसोबत लाखोंच्या संख्येने शेगावला जातात. तर शेगांव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी वारकऱ्यांसह पालखीवर पुष्प टाकून स्वागत केले.
तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी लाभू द्या, राज्यसह राज्यातील शेतकऱ्यांवर कुठलेही संकट येऊ देऊ नको अशी प्रार्थना मंत्री आकाश फुंडकर यांनी केली आहे.