अमरावती जिल्ह्याच्या धारणी बिजूधावडी मार्गे व हरीसाल चिखली मार्गे अकोला जिल्ह्यातील अकोट येथे जाणारा महामार्ग हा जंगल पहाड भागातून खोंगडा फाट्यावरून दोन वेगवेगळ्या मार्गे परसापुर व अकोट असा व ९० किलोमीटर चा प्रवास करत जावे लागते.
मध्यरात्री मुसळधार पाऊस पडल्याने वनविभागाच्या कोहानाक्यापासून तर बेलकूंड रेस्ट हाऊस रस्त्यादरम्यान पहाडा वरील दरड व मोठे दगड पडल्याने रस्ता काही तास बंद होऊन वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे त्या रस्त्यावरील एसटी महामंडळाची बस सह खाजगी वाहने यांचा प्रवास थांबला. यानंतर त्या बस व खाजगी वाहनातील प्रवाशांनी स्वतः रस्त्यावरील मोठमोठी दगडे व मुरूम स्वतः साफ करून प्रवास केला.