नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या लिंबाचे भाव हे कमी झाले आहेत. पावसामुळे लिंबू उत्पादनावर याचा परिणाम झाला आहे. लिंबाचे भाव इतके घसरले आहेत की, चक्क एक रुपयांना देखील एक लिंबू विकला जात आहे. आधी पाच रुपयांचा मिळणारा लिंबू आता एक ते तीन रुपयांना मिळत आहे.
सध्या जोरदार पाऊस असल्याने याचा फटका लिंबू व्यापारावर झाला आहे. त्यामुळे बाजारातील व्यापारी चिंतेत आहेत. पुढील काही दिवस लिंबाचे भाव कमीच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हंटले आहे.