सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येलूर येथे पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये. येलूर मधील पाटील वस्तीवर पाळीव श्वान घराबाहेर बांधण्यात आला होता. त्याच्यावर मध्यरात्री बिबट्याने झडप घातली. त्यानंतर त्याला ठार मारले. वाळवा आणि शिराळा या दोन तालुक्यात गेल्या काही दिवसात बिबट्याचे हल्ले वाढलेत. त्यामुळे पशुपालकातून चिंता व्यक्त केली जात आहे.