रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी साचलेल्या पाण्यात लोटांगण घेत स्थानिकांचे आंदोलन

रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी साचलेल्या पाण्यात लोटांगण घेत स्थानिकांचे आंदोलन
  • MG News
  • जुलै 29 2025

Share on  

बीड शहरातील धानोरा रोडची मागील 15 वर्षांपासून दुरावस्था आहे. रस्त्याची दुरुस्ती व्हावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते. मात्र संबंधित प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांनी खड्ड्यातील पाण्यात लोटांगण घेत आंदोलन केले.

बीड शहरासह परिसरातील अनेक गाव खेड्यांना धानोरा रोड जोडला गेला आहे. परंतु या रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. पावसाळ्यात याची अवस्था अधिक वाईट होते. गुडघाभर पाण्यात नागरिकांना वाट काढावी लागते. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात लोटांगण घेऊन लक्षवेधी आंदोलन केले.

संबंधित बातम्या