जिल्ह्यात जनावरांवर लंपी आजाराचा प्रकोप, ४९५ जनावरांना लागण, तर १० मृत

जिल्ह्यात जनावरांवर लंपी आजाराचा प्रकोप, ४९५ जनावरांना लागण, तर १० मृत
  • MG News
  • ऑगस्ट 8 2025

Share on  

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, मलकापूर, सिंदखेड राजा, खामगाव आणि चिखली या पाच तालुक्यातील गावांमध्ये जनावरांवर लंपी या आजाराचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच पशुसंवर्धन रोग व अन्वेषण सह आयुक्त कार्यालयाच्या अहवालातून समोर आल आहे. त्यानुसार जिल्ह्यात ३ लाख ६० हजार ८१५ गौ वर्गीय जनावरे असुन ४९५ जनावरांना लंपी ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी २६७ जनावरे बरी झाली आहेत तर २२८ जनावरांवर उपचार सुरू असून  १० जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्या परिसरापासून दहा किलोमीटर क्षेत्र बाधित व निगराणी क्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केले आहे. नियंत्रित क्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनाची तातडीने सुरुवात करण्यात आली आहे, गाई, म्हशी यासारख्या जनावरांची वाहतूक किंवा स्थलांतरण करण्यास त्याचबरोबर बाधित जनावरांना नियंत्रित क्षेत्रातून बाहेर नेण्यास देखील मनाई करण्यात आली आहे.
 

संबंधित बातम्या