सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षभरानंतर पाळीव जनावरांमध्ये 'लम्पी' आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराने ५९३ जनावरे लम्पी आजाराने बाधित झालीत. त्यातून ४१८ जनावरे बरी देखील झाली आहेत. जिल्ह्यात एकूण पशुधन १ लाख ३२ हजार आहेत. त्यामधून जिल्ह्यातील १०२ दवाखाना अंतर्गत ८२ हजार जनावरांना लसीकरण पूर्ण झाले आहे.
या आजाराला शेतकऱ्यांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी आणि प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांनी औषधोपचार व लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. समीर बिलोलीकर यांनी केले आहे.