उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंबा देवी मंदिरात महाआरती

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंबा देवी मंदिरात महाआरती
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

 शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या उदंड व निरोगी आयुष्यासाठी बुलढाण्याचे ग्राम दैवत असलेल्या जगदंबा देवीला पातळ चढवून महाआरती करण्यात आली. त्यापूर्वी शेतकऱ्यांना मोफत वृक्ष वाटप, ग्रामीण भागात वृक्षारोपण,जिल्हा परिषद शाळेतील ५ हजार विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप , मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. त्यानंतर बुलढाणा येथील गर्दे वाचनाच्या सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद मेळावा देखील पार पडला. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख नाहीतर संपुर्ण महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणुन त्यांनी कोरोना काळात काम केले. संपूर्ण राज्यांनी देशांनी पाहिले. दरवर्षी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या माध्यमातून वाढदिवस साजरा करत असतो . वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली. तसेच रक्तदान शिबिर घेत साजरा केला.

यावेळी  प्रवक्ता जयश्रीताई शेळके, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ.चंदाताई बढे ,सहसंपर्क प्रमुख छगनदादा मेहेत्रे, डी. एस. लहाने सर, जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, उपजिल्हा प्रमुख लखन गाडेकर  यांचेसह प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. 

संबंधित बातम्या