महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांचे ग्रामस्थांसह भर पावसात आंदोलन

महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांचे ग्रामस्थांसह भर पावसात आंदोलन
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी बीड परळी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जात आहे.

भर पावसात हे आंदोलन सुरू असून, या खून प्रकरणाच्या तपासाकरिता एसआयटी नियुक्त करावी. व त्या एसआयटी मध्ये पंकज कुमावत यांचा समावेश करावा, या मागणीवर ग्रामस्थ ठाम आहेत. जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदारांनी भेट दिली परंतु ग्रामस्थांनी त्यांना आम्ही निवेदन तुम्हाला देणार नाही. आम्हाला तुमच्याकडूनच यासाठी बाबतचा आदेश हवा आहे. असा पवित्र  घेतला असल्याने आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

संबंधित बातम्या