आषाढी वारी महोत्सवात सामील झाल्यानंतर श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहुन परतीच्या मार्गावर आहे. आज या पालखीचा अंतिम टप्पा आहे. आज खामगाव येथे या पालखीच आगमन व शेवटचा मुक्काम असेल व उद्या पालखी शेगाव येथे प्रस्थान करणार आहे.
त्यानिमित्त श्री संत गजानन महाराज उपासना परिवार कडून महाराजांना १लाख ११हजार १११ मोदकांचा महाप्रसाद अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर हा प्रसाद दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना वितरित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यातील गजानन भक्त मोदक तयार करून खामगाव येथे संकलित करतात. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. या संपूर्ण सोहळ्याला लाखो भाविक हजेरी लावतात.