खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकसंघ आहे. पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे हे सिंधुदुर्गाचे कुटुंब एकत्रित ठेवण्यासाठी सक्षम नेतृत्व आहे. राणे कुंटुंबियांवर टीका करून आजपर्यंत आपली कारकिर्द करणाऱ्या उबाठाच्या काही नेत्यांना त्यांची जागा दाखवून देणार. आमच्यासाठी उबाठा हेच टार्गेट आहेत. त्यांचे पक्षप्रवेश होत आहेत. मी प्रामाणिकपणे माझ्या पक्षासाठी काम करत असताना महायुती खासकरून खा. नारायण राणे यांचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांचा आदेश माझ्यासाठी महत्वाचा आणि अंतिम असेल, अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी भूमिका मांडली.